छत्रपती कॉलेजमधील ९ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूमधून औषध कंपनीत नोकरीसाठी निवड !

श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्लेसमेंट सेल आणि रसायनशास्त्र विभाग मार्फत बुधवार दि.६ जून २०२३ रोजी कॅम्पस इंटरव्ह्यू चे आयोजन करण्यात आले होते. पुणे येथील नामांकित इन्फिनीया सायन्स लि. या औषध कंपनीतील अधिकाऱ्यांनी लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे ६ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली.कंपनीच्या वतीने डॉ.गणेश फडतरे, हितेश गांधी आणि  नीळकंठ काळे यांनी मुलाखती घेतल्या. याआधी मागील आठवड्यात ३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.असे एकूण ९ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

नागवडे कारखान्याचे संचालक प्रशांतजी दरेकर यांनी स्वागत समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करताना आपल्या भाषणात म्हटले की, “श्री छत्रपती शिवाजी  कॉलेजमधील आणि आसपासच्या पंचक्रोशीतील बेरोजगार विद्यार्थ्यांना बापूंनी उभारलेल्या कॉलेजवर हाताला काम मिळत आहे,अजून विद्यार्थ्यांच्या हातात निकाल आलेला नाही, तरी पण त्यांच्या हाताला काम मिळालेले आहे. खरं म्हणजे  बापूंचे आणि आदरणीय राजेंद्र दादा नागवडे यांचे स्वप्न साकार होत असल्याचे त्यांनी नमूद केले”. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सुर्यवंशी म्हणाले की, या वर्षी आम्ही जास्तीत जास्त विदयार्थ्यांना रोजगार देण्याकरता या महिन्यात कॅम्पस मुलाखतींचे आयोजन करणार आहोत. नॅक चे ए प्लस मानांकन, पोलीस भरतीमधील यश,कॅम्पस मुलाखती आणि करिअर कट्टा अंतर्गत राज्य शासनाचे उत्कृष्ठ महाविद्यालय म्हणून ३ पुरस्कार या सर्व गोष्टी कॉलेजच्या शिरपेचातील मानाचे तुरे असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कोमल कांबळे यांनी केले, प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा.मनोहर सुर्यवंशी यांनी तर कंपनी अधिकाऱ्यांची ओळख प्लेसमेंट सेल चेअरमन प्रा.विलास सूद्रिक यांनी करून दिली.कंपनीच्या वतीने डॉ.गणेश फडतरे यांनी कंपनीच्या प्रॉडक्ट बद्दल माहिती दिली. सर्वांचे आभार डॉ. ज्ञानेश्वर कर्पे यांनी मानले.

या मेळाव्यात संशोधन विभागातील संधी एम. एस्सी ऑरगॅनिक केमिस्ट्री मधील अंतिम वर्षाच्या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी होत्या. २८ विद्यार्थ्यांनी कॅम्पस करता नोंदणी केली त्यापैकी १६ विद्यार्थी लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले.यामधून मुलाखतीद्वारे एकूण ६ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये गायकवाड प्रमिला, प्रतिक्षा गिरमकर,अक्षय काटे, धीरज वाघमारे, प्रितम मोढळे आणि संध्या कुदांडे तसेच योगिता पोकळे ही सिंकेमिया लि.,पुणे येथे रुजू झाली आहे.

दिनांक ८ जून २०२३ रोजी या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कॉलेजचे प्राचार्य डॉ.सतीश चंद्र सुर्यवंशी यांनी कौतुक करून सत्कार केला.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे, नागवडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस, जिल्हा बँक संचालिका सौ.अनुराधाताई नागवडे, दिपकशेठ नागवडे, सेक्रेटरी बापुराव नागवडे, निरीक्षक सचिनराव लगड, सर्व विश्वस्थ व कॉलेजमधील सर्व कर्मचारी वृदांनी अभिनंदन केले.

Blog Attachment

Leave us a Comment

logged inYou must be to post a comment.