श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना स्पिरुलिना शेतीचे ज्ञान लाभले.

Education-Tour

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अभ्यासक्रमात महाविद्यालयांनी शैक्षणिक सहल आयोजित करावेत, असे नमूद केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून, श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात न फिरता स्वता उद्योग व्यवसाय करून नवीन रोजगार निर्माण करावे, यासाठी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने द्वितीय वर्ष विज्ञान या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक भेट दि. ११ एप्रिल २०२३ रोजी “स्पिरुलिना लागवड आणि प्रशिक्षण केंद्र घनवट फार्म”, कारखान्याजवळ, श्रीगोंदा, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आली होती. या शैक्षणिक भेटीसाठी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. योगेश आहिरे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुर्यवंशी सतीशचंद्र त्यांच्या मार्गदर्शनाखाली भेटीचे आयोजन केले.या सहलीसाठी महाविद्यालयातील पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी घनवट फार्मचे मालक श्री प्रकाश घनवट यांनी स्पिरुलिना बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, स्पिरुलिना हे बीजीए शैवाल असून ते सिंगल सेल प्रोटीन म्हणून वापरले जाते, या शेवाळापासून स्पिरुलिना गोळ्या, बिस्किट, सरबत इत्यादी तयार करून त्यांचा उपयोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी केला जातो . श्री घनवट यांनी स्पिरुलिनाची लागवड कशी करावी, पाणी व्यवस्थापन, पाण्याचे पीएच कसे राखावे, काढणी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच स्पिरुलिनाचे पावडर बनवून आणि प्रत्यक्ष मशीन द्वारे स्पिरुलीनाच्या गोळ्या तयार करून विद्यार्थ्यांना दाखवले . श्री घनवट यांना २० वर्षांचा अनुभव आहे आणि ते विद्यार्थ्यांना, संशोधकांना व शेतकर्‍यांना स्पिरुलिनाबाबत प्रशिक्षण देतात. त्यांनी तयार केलेल्या स्पिरुलिनाच्या गोळ्या भारतभर वितरित केल्या जातात. प्रश्नोत्तरामध्ये विद्यार्थ्यांनी लागवड, पॅकिंग व विक्री यासंदर्भात प्रश्न विचारले असता त्याचे समाधानकारक उत्तर श्री प्रकाश घनवट यांनी दिले. या दौऱ्यासाठी प्रा.दांडेकर एस.डी. आणि श्री कलगुंडे विलास हे देखील उपस्थित होते. शेवटी महाविद्यालयाच्या वतीने डॉ. योगेश आहिरे यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave us a Comment