श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील २ अध्यापकांना शिक्षणरत्न पुरस्कार.

ग्रीन वर्ल्ड आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट (Pune) यांच्या संयुक्त विद्यमाने “ग्रीन वर्ल्ड डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न” पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील BBA(CA) विभागप्रमख प्रा. मनोहर उंडे आणि B.Sc. Computer Science /M.Sc. Computer Science विभागप्रमुख प्रा. अमोल बोराडे यांना हा आदर्श शिक्षक पुरस्कार पुणे येथे दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी वितरित करण्यात आला. या यशाबद्दल श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, नागवडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा. बाबासाहेब भोस, जिल्हा बँक संचालिका सौ. अनुराधाताई नागवडे, निरीक्षक सचिनराव लगड, कॉलेजचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सुर्यवंशी, सर्व विश्वस्थ, तसेच कॉलेजमधील सर्व कर्मचारी वृदांनी अभिनंदन केले


