सलग ६ वर्षे छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा व्हॉलीबॉल संघ विजयी


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , अहिल्यानगर जिल्हा क्रीडा समिती व छत्रपती शिवाजी महाविद्यालय आयोजित आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धा आज पार पडल्या.विविध महाविद्यालयांतील एकुण २६ संघ सहभागी झाले होते. व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा. श्री बाबासाहेब भोस,नागवडे साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन व विद्यमान संचालक सुभाषककाका शिंदे , प्रशांतजी दरेकर , प्रा. सुरेश रसाळ हेही प्रमुख पाहुणे उपस्थित होते अहिल्यानगर जिल्हा क्रीडा समितीचे सचिव डॉ. राजेंद्रकुमार देवकाते जेष्ठ क्रीडा संचालक शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. जाधव सर हेही उपस्थित होते. उद्धघाटन पर भाषण करताना मा.श्री.सुभाषकाका शिंदे व प्रशांतजी दरेकर यांनी खेळाचं महत्त्व विशद केले व खेळातून बौद्धिक व मानसिक रित्या कसं तंदुरस्त राहू शकतो हे सांगितल अध्यक्षीय भाषणामध्ये मा. श्री बाबासाहेब भोस यांनी खेळातून करिअर कसं घडू शकत व सरावाशिवाय खेळाडूंना पर्याय नाही असे सांगितले प्रास्ताविक महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रा. रसाळ सरांनी केले . आज झालेल्या सामन्यांमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय व संजीवनी कॉलेज कोपरगाव यांच्यामध्ये चुरशीचा सामना होऊन (२५-१३,२५-२०) अशा गुणांनी छत्रपती शिवाजी महाविद्यालय सलग ६ व्या वर्षी विजयी झाले. या संघामध्ये शिवराज सुपेकर, आदित्य मिसाळ, ओम् कोकणे, मनोज कोथींबीरे, नंदन अडसूळ, कार्तिक कोथींबीरे या खेळाडूंनी उत्कृष्ठ कामगिरी केली.
विजयी संघाचे संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. राजेंद्रदादा नागवडे साहेब यांनी अभिनंदन केले तसेच संस्थेचे निरीक्षक श्री. सचिन लगड सर ,प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी सर ,उपप्राचार्य प्रा. कातोरे सर , पर्यवेक्षक प्रा. टकले सर यांनीही अभिनंदन केले विजयी संघास क्रिडा संचालक डॉ . सतिश चोरमले सर व क्रिडा शिक्षक डॉ महेश गिरमकर सर यांचे मार्गदर्शन लाभले