छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील अकाउंटन्सी या विषयांमध्ये तेजस्विनी चाकणे ९९ मार्क्स, स्वप्निल गोरे ९९ मार्क्स व नलगे प्रीतल या विद्यार्थ्यास ९७ मार्क्स मिळाले आहेत.या विद्यार्थ्यांना जवळपास आऊट ऑफ मार्क मिळाले आहे. वाणिज्य शाखेत तेजस्विनी चाकणे ९०.५०% या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक, कदम आकांशा ८८.०० % या विद्यार्थिनीचा व्दितीय क्रमांक, नलगे प्रीतल ८७.६७ % या विद्यार्थिनीचा तृतीय क्रमांक,स्वप्निल गोरे ८५.५० % या विद्यार्थ्याचा चतुर्थ क्रमांक पटकावला आहे.तसेच विज्ञान विभागातील निकाल ९५.७४ % व गव्हाणे संकेत रुपचंद ९३.५० % या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य मा. सतीशचंद्र सूर्यवंशी सर, वाणिज्य विभाग प्रमुख श्री.पाटील सर, वाणिज्य शाखेतील प्रा.वैभव सोनवणे, प्रा.स्वप्निल पवार, प्रा.पांगारकर एस एस, प्रा.बोरुडे मॅडम, माने मॅडम व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंदातर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे मनःपूर्वक अभिनंदन✌️